Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एरंडोल पत्रकार संघातर्फे कोरोना योद्ध्यांचा सत्कार

एरंडोल प्रतिनिधी । तालुका पत्रकार संघातर्फे कोरोना काळात जीवाची पर्वा न करता असंख्य रुग्णांची सेवा करणारे व एरंडोल तालुक्यातील जेष्ठ पत्रकाराचे प्राण वाचवल्याने एरंडोल तालुका आरोग्याधिकारी डॉ.फिरोज शेख यांचा सत्कार व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.कैलास पाटील यांच्या वाढदिवस साजरा करुन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एरंडोल तालुका पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष बी.एस.चौधरी हे होते.त्यांनी आपल्या मनोगतात एरंडोल येथील जेष्ठ पत्रकार यांचे कोरोना काळात शर्थीचे प्रयत्न करुन प्राण वाचल्यामुळे एरंडोल तालुका वैद्यकीय विभगातील सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे ऋण व्यक्त केले व   डॉ.फिरोज शेख,डॉ.कैलास पाटील व पत्रकार उमेश महाजन यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष कैलास महाजन,सचिव पंकज महाजन,कोषाध्यक्ष कुंदनसिंग ठाकुर,सह सचिव पिंटू राजपुत,समन्वयक दिनेश चव्हाण,हिशेब तपासनीस नितीन ठक्कर,प्रसिद्धी प्रमुख उमेश महाजन आदी पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सुधीर शिरसाठ यांनी केले.सूत्रसंचलन कैलास महाजन यांनी तर आभार नितीन ठक्कर यांनी मानले.

 

Exit mobile version