Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : कानळदा लसीकरण केंद्रातून कोरोना लसींची चोरी; दोन पारिचारीकांना रंगेहात पकडले

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कानळदा येथील लसीकरण केंद्रातून दोन पारिचारिकांनी कोरोनाच्या लसींची चोरी करून त्या लसी ओळखीच्या नागरीकांना कारमध्ये बसून देत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. 

गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असतांना जिल्ह्यातील ४३ लसीकरण केंद्रावर कोरोनाची लस देण्यात येत आहे. काही ठिकाणी लस उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद आहे. परंतू तालुक्यातील कानळदा येथील दोन पारिचारिकांनी चक्क लसींची चोरी करून आपल्या फायद्यासाठी आयकार्ड घालून केंद्राबाहेरील रस्त्यावर एका कारमध्ये बसून लस देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकार काही नागरीकांच्या लक्षात येता दोन्ही पारिचारीकांनी उडावाउडवीची उत्तरे दिली. असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान या प्रकाराबाबत आरोग्य यंत्रणेकडून समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. 

Exit mobile version