Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यात आतापर्यंत 14 लाख 21 हजार जणांना कोरोना लसीकरण

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 14 लाख 21 हजार 956 लाभार्थ्यांना कोरोना लस देण्यात आली आहे. यात 10 लाख 38 हजार 317 जणांना पहिला डोस तर 3 लाख 83 हजार 639 जणांना दुसरा डोस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार यांनी आज शुक्रवार 3 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता पाठविलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे. 

 जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोनापासून बचावासाठी लस महत्वपूर्ण असल्याने आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद दिला आहे. जळगाव जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्रामार्फत जिल्ह्यात आतापर्यंत 10 लाख 38 हजार 317 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 3 लाख 83 हजार 639 लाभार्थ्यांना दुसरा डोस असे एकूण 14 लाख 21 हजार 956 लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहे. यात शहरी भागातील 6 लाख 38 हजार 902 तर ग्रामीण भागातील 7 लाख 83 हजार 054 नागरीकांचा समावेश आहे. नागरीकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार यांनी आज शुक्रवार 3 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता दिलेल्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Exit mobile version