Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नाहाटा महाविद्यालयात कोरोना लसीकरण मोहिम संपन्न

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ येथील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात ‘कोविड १९’ लसीकरणाची मोहीम राबविण्यात आली. याप्रसंगी १५ वर्षावरील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.

शासनाच्या धोरणाप्रमाणे ‘१५ वर्षावरील विद्यार्थ्यांची ‘कोविड १९’ लसीकरणाची मोहीम’ भुसावळ कला विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात संपन्न झाली. नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप चिद्रवार, उद्योजक, स्पेक्ट्रम इंडस्ट्रीजचे सीईओ दीपक चौधरी, ‘लाईव्ह ट्रेंड न्यूज’चे संपादक शेखर पाटील, संस्थेचे सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजयकुमार नाहाटा, डॉ.संदीप जैन, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य प्रा.उत्तम सुरवाडे, पर्यवेक्षक प्रा.शोभा तळेले आदी. मान्यवरांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेचे उद्घाटन संपन्न झाले.

मुख्य कार्यकारी अधिकारी, संदीप चिद्रवार यांनी “कोणत्याही शंकाकुशंका मनात न ठेवता सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व्हॅक्सिनेशन करून घ्यावे” असे आवाहन याप्रसंगी बोलतांना केले. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी उद्योजक, दीपक चौधरी यांनी याप्रसंगी ‘महाविद्यालयाला आर्थिक आणि टेक्नालाजी’च्या संदर्भात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन विद्यार्थी दशेतील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी बोलताना ते भावुक झाले.

यावेळी इलेक्ट्रॉनिक मीडियातज्ञ ‘लाईव्ह ट्रेंड न्यूज’चे संपादक शेखर पाटील यांनी, “आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून महाविद्यालय राबवत असलेल्या उपक्रमांना समाज माध्यमाच्याद्वारे जगभर पोचले पाहिजे.त्यासाठी आवश्यक असलेली सगळी टेक्नालाजी आपण महाविद्यालयात देण्यास तयार असल्याचे” याप्रसंगी बोलताना सांगितले.

उपप्राचार्य म्हणाले की, “वरिष्ठ महाविद्यालय प्रमाणेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची देखील संघटना असली पाहिजे. त्यांच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या उन्नती आणि विकासासाठी त्यांचं सर्वतोपरी सहकार्य लाभत असत. आपल्याला या इलेक्ट्रॉनिक मीडियाचा उपयोग करून घेतला पाहिजे.” प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे यांनी त्याला मान्यता देऊन या उपक्रमासाठी सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्या.

“विद्यार्थ्यांच्या शिस्तीसाठी कायदा-सुव्यवस्था पाळण्याच्या कामास महाविद्यालयास आपले सर्वतोपरी सहकार्य राहील” असे बाजारपेठ पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक, दिलीप भागवत यांनी याप्रसंगी बोलताना आश्वासन दिले. डॉ.भाग्यश्री भंगाळे, समन्वयक प्रा टी एस सावंत, प्रा स्वाती पाटील, प्रा आर एम खेडकर, प्रा एन वाय पाटील, प्रा शैलेश पाटील, यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी महेश सरोदे, परिचारिका रोहिणी सरोदे, कुमार पाचपांडे ,भारती चौधरी, कल्पना लागीर, ज्योती पवार, अर्चना नेहते, प्रशांत कुलकर्णी, प्रा एल.पी टाक, प्रा आर पी मसाने, प्रा जे डी धांडे, प्रा एच बी राजपूत, कार्यालयीन अधिक्षक भगवान तायडे, कर्मचारी वृंद, कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

Exit mobile version