Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : जिल्ह्यात दिवसभरात १५८ बाधित रूग्ण आढळले; ६२९ रूग्ण झाले बरे !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आढळून आलेल्या रूग्ण संख्येच्या चार पट रूग्ण कोरोनामुक्त झाली आहेत. आज जिल्हाभरात १५८ बाधित रूग्ण आढळले आहे तर ६२९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. 

आजची आकडेवारी

जळगाव शहर-१८, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ-७, अमळनेर-१, चोपडा-२, पाचोरा-४, भडगाव-७, धरणगाव-०, यावल-४, एरंडोल-२०, जामनेर-६, रावेर-२०, पारोळा-२, चाळीसगाव-४५, मुक्ताईनगर-४, बोदवड-१३ आणि इतर जिल्हे २ असे एकुण १५८ बाधित रूग्ण आढळले आहे.

जिल्ह्यातील आजच्या अहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४० हजार ६०४ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३४ हजार २२७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ३ हजार ८२९ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरातून ४ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे. 

 

Exit mobile version