Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : जिल्ह्यात आज दिवसभरात दोन संक्रमित रूग्ण आढळले; २ झाले बरे !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात २ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर दोन रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

जिल्हा प्रशासनाकडून आज शुक्रवारी २९ ऑक्टोबर रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज दिवसभरात जळगाव शहरातून दोन बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्याप्रमाणे शहरातीच दोन जण बरे होवून घरी परतले आहे. आता जिल्ह्यात १६ बाधित रूग्ण उपचार घेत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४२ हजार ७७९ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार १८६ बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ५७७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

Exit mobile version