चिंचोली विद्यालयात ‘कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबीर’ संपन्न

यावल प्रतिनिधी | चिंचोलीच्या सार्वजनिक उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विद्यालयात ‘कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबीर’ संपन्न झाले.

देशात ओमायक्रॉनसह कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा प्रार्दूभाव वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासन सर्तक झाले असून यावल तालुक्यात ‘कोवीड१९’ प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमास वेग आला आहे. तालुक्यातील चिंचोली येथील सार्वजनिक उच्च माध्यमिक व व्यवसाय अभ्यासक्रम विद्यालय इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना आज सोमवार, दि.१८ जानेवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव व उपकेंद्र चिंचोलीच्या माध्यमातून १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थी मुला-मुलींसाठी लसीकरणाचे शिबीर आयोजीत करण्यात आले होते.

यावेळी यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ .हेमंत बऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली किनगाव प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा महाजन व डांभूर्णी केंद्रप्रमुख प्रदीप सोनवणे यांनीही चिंचोली विद्यालयाला लसीकरणाच्या वेळी भेट दिली. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे शिबीर यशस्वी करण्यासाठी चिंचोली, ता.यावल येथील सार्वजनिक उच्च माध्यमिक व व्यवसाय अभ्यासक्रम विद्यालयाचे प्राचार्य पी.जी.शिंदे यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व किनगाव आरोग्य केन्द्राअंतर्गत येणाऱ्या चिंचोली उपकेन्द्राचे प्राथमिक आरोग्य कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. शिबीरास विद्यार्थी, विद्यार्थीनी यांनी लसीकरण करुन घेतले.

Protected Content