Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नातवाला संसर्ग नको म्हणून कोरोना पॉझिटिव्ह दाम्पत्याने ट्रेन समोर उडी घेत संपवलं आयुष्य !

कोटा : वृत्तसंस्था ।  कोचिंग सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटा शहरात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या वृद्ध दांपत्याने आपल्यामुळे नातवालाही संसर्ग होईल या भितीपोटी   ट्रेन समोर उडी घेत   आत्महत्या केली आहे. या  कुटुंबियांना यामुळे जबर मानसिक धक्का बसलाय.

पोलीस उपाधीक्षक भगवत सिंह हिंगड यांनी  दिलेल्या माहितीनुसार  घटना रविवारी सायंकाळी घडली.  रेल्वे कॉलीनीमध्ये राहणारे हीरालाल बैरवा (वय ७५) आणि त्यांची पत्नी शांती बैरवा (वय ७५) हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं शनिवारी स्पष्ट झालं.  रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने दोघेही तणावाखाली होते. त्यांनी घरीच क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला. मात्र आपल्यामुळे  नातू रोहित याला  संसर्ग होणार नाही ना अशी चिंता त्यांना होती.

रविवारी सायंकाळी कोणालाही काहीही न सांगता हीरालाल आणि शांती दोघेही घरातून निघून गेले. त्यानंतर त्यांनी कोटाहून दिल्लीला जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर रेल्वे समोर उडी मारुन आत्महत्या केली.  तपास केल्यावर या दोघांची ओळख पटली. तपासादरम्यान या दांपत्याचा मुलाचे आठ वर्षापूर्वी निधन झाल्याची माहिती समोर आली. मुलानंतर नातूही आपल्यापासून दूर जाईल आणि त्याला काही झालं तर आपण त्यासाठी जबाबदार असू अशी भीती या दोघांच्या मनात असल्याने त्यांनी आत्महत्या केली. कोटामध्ये  बाधितांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. येथील पोलीस खात्यामधील ६०० हून अधिक कर्मचारी आणि अधिकारी आतापर्यंत  बाधित झाले आहेत.

Exit mobile version