Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : जिल्ह्यात आज बाधित रूग्ण आढळला नाही; चार रूग्ण झाले बरे !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात एकही बाधित रूग्ण आढळला नाही. तर ४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.  अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

जळगाव जिल्हा रूग्णालयाने आज पाठविलेल्या कारोना अहवालात आज एकही बाधित रूग्ण आढळून आलेला नाही. तर ४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात ७ ॲक्टीव रूग्ण रूग्णालयात उपचार घेत आहे. जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ८०१ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २१३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५७७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

 

 

Exit mobile version