Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देशात कोरोनाचा संसर्ग कायम : राज्यात मात्र रूग्णवाढ मंदावली !

मुंबई प्रतिनिधी | गेल्या चोवीस तासांमध्ये देशभरातील कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होतच असल्याचे दिसून आले असतांना महाराष्ट्रात मात्र तुलनेत वाढ मंदावल्याचे स्पष्ट झाले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासात २ लाख ५८ हजार ८९ कोरोना रुग्णांची नोंद झालीय. ओमिक्रॉन  बाधितांची संख्या देखील आठ हजारांच्या वर गेली आहे. गेल्या चोवीस तासात १ लाख ५१ हजार ७४० जण कोरोनामुक्त झाले असून ३८५ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. देशातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या ८२०९ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात ८ नव्या ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद रविवारी झाल्याचं समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासात १ लाख ५१ हजार ७४० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार रविवारी २ लाख ५८ हजार ८९ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या २४ तासात ३८५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा ४ लाख ८६ हजार ४५१ वर पोहोचलाय.

राज्यात रविवारी ४१ हजार ३२७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर २९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात ४० हजार ३८६ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. तर राज्यात रविवारी ८ ओमिक्रॉनबाधितांची नोंद झालीय. महाराष्ट्रातील एकूण ओमिक्रॉन रुग्णांचा आकडा १ हजार ७३८ वर पोहोचला आहे. त्यातले ९३२ रुग्ण ओमिक्रॉनमुक्त झाले आहेत.

 

Exit mobile version