Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : जिल्ह्यात दिवसभरात एक बाधित तर २ झाले बरे

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा रुग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालानुसार आज दिवसभरात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला असून दोन रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात करत सुखरुप घरी पोहोचले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयात कडून आज प्राप्त झालेल्या अहवात दिवसभरात एक बाधित रूग्ण आढळला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७७१ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर दोन रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत १ लाख ४० हजार १८० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १४ रूग्ण उपचार घेत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २ हजार ५७७ रूग्णांचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

 

Exit mobile version