Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : जिल्ह्यात एकाला बाधा तर दोन कोरोनामुक्त

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा रूग्णालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार आज दिवसभरात एक कोरोना बाधित रूग्ण आढळून आला आहे. तर दोन संक्रमित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

आज दिवसभरात एक बाधित रूग्ण आढळून आला असून आता पर्यंत जिल्ह्यात १ लाख ४२ हजार ७८० बाधित रूग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, ८ रुग्ण सद्याला उपचार घेत आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार १९५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आतापर्यंत २ हजार ५७७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

 

 

Exit mobile version