Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोनामुळे यावल एस.टी.च्या उत्पन्नात घट

यावल प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एसटी आगाराने खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामीण भागात फेऱ्‍या बंद केल्याने एसटीच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. तर दुसरीकडे अवैध प्रवासी वाहतुकीस सुगीचे दिवस आले आहेत. 

यावलचे एसटी आगाराची मर्यादीत बससेवा सुरू करण्यात आली असुन याचा सरळ परिणाम आगाराच्या उत्पन्नावर पडला आहे. सपुंर्ण देशासह महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणुच्या महामारीने मोठे संकट नागरीकांसमोर टाकले असता गेल्या मार्च महिन्यापासुन लॉकडाऊनच्या काळात नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोणातुन खबरदारीचा उपाय म्हणुन राज्यात सर्व बस सेवा बंद करण्यात आली होती. गेली सहा महिन्यापासुन पुर्णपणे बंद असलेली ग्रामीण नागरीकांची दळण वळणाचे साधन व लाईफलाईन अशी ओळख असलेली एसटी बससेवा ही महामंडळाने हळुवार सुरू करण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने यावल एसटी आगारातुन सद्य पारिस्थितीला काही मोजक्या लांब पल्याच्या बसेस सुरू केल्या आहेत. 

मात्र यावल तालुक्यातील ग्रामीण भागातील जवळपास ६०गावांना एसटी बसेस आगारातुन प्रति दिवस सोडण्यात येत असतात परंतू लॉकडाऊनचा कार्यकाळ आता संपला असला तरी यावल आगारातुन अनेक खेडया पाड्यांवर अद्याप बसेस सुरू करण्यात येत नसल्याने ग्रामीण भागातील प्रवासांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. याच संधीचा फायदा काल बाह्याय झालेल्या वाहनातुन अवैध प्रवासी वाहतुक करणाऱ्यांना चांगलेच फावले असुन, अवैध एस.टी प्रवासी वाहतुक करणारी मंडळी ही गरजु प्रवासांकडुन अव्वा की सव्वाभाडे वसुल करीत असल्याची ग्रामीण प्रवासांची ओरड आहे. यावल आगारातुन आवश्यक त्या ठीकाणी बसेस सोडण्यात येत नसल्याचा फटका आगाराच्या उत्पन्नावर पडत आहे. याशिवाय यावल आगारात असलेल्या बसेस या नियमीत कोरोनाच्या गोंधळात स्वच्छ व निर्जतुकीकरण करण्यात येत नसल्याने ही प्रवासांनी आरोग्याच्या दृष्टीने एसटी बसकडे पाठ फिरवली असावी असा देखील अंदाज लावला जात आहे.

 

Exit mobile version