Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : जिल्ह्यात आज एक बाधित रूग्ण आढळला

जळगाव प्रतिनिधी ।  जळगाव जिल्हा रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात १ बाधित रूग्ण आढळून आला आहे. तर १ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

 

जिल्ह्यात आज दिवसभरात एक बाधित रूग्ण आढळून आला आहे. तर जळगाव ग्रामीण भागातून १ बाधित रूग्ण बरा होवून घरी परतला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७८५ रूग्ण आढळून आला आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २०१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५७७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

Exit mobile version