Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : जिल्ह्यात एक बाधित रूग्ण आढळला; ३ रूग्ण झाले बरे !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात एक बाधित रूग्ण आढळून आला आहे. तर तीन रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातून एक बाधित रूग्ण आढळला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ८०२ बाधित रूग्ण आढळून आले होते. त्यापैकी १ लाख ४० हजार २२० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५७७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ५ ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

 

 

 

 

 

Exit mobile version