Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : जिल्ह्यात दिवसभरात ४४ बाधित रूग्ण आढळले; १४२ रूग्ण झाले बरे !

जळगाव प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्ण संख्या आटोक्यात येत आहे. जिल्हा कोवीड रूग्णालयात आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरातून ४४ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १४२ रूग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहे. आज चाळीसगाव तालुक्यातील एका बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

आजची तालुकानिहाय आकडेवारी

जळगाव शहर-८, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ-११, अमळनेर-०, चोपडा-३, पाचोरा-१, भडगाव-१, धरणगाव आणि यावल-०, एरंडोल-१, जामनेर-०, रावेर-५, पारोळा-२, चाळीसगाव-५, मुक्ताईनगर-३ आणि बोदवड-१ असे एकुण ४४ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

 

आजच्या अहवालानुसार आजपर्यंत १ लाख ४२ हजार १५१ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३८ हजार ७१३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ८६८ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. तर दिवसभरात एका बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हाशल्यचिकित्स डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

Exit mobile version