Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल नगरसेवकासह महसुल अधिकाऱ्याला कोरोनाची लागण

यावल प्रतिनिधी । कोरोना विषाणु संसर्गाचा प्रार्दुभाव मोठ्या वेगाने तालुक्यातील ग्रामीण भागांसह शहरी भागात वाढला आहे. दरम्यान,  आज मिळालेल्या माहितीनुसार, पॉझीटीव्ह रूग्णांमध्ये एका महसुल अधिकाऱ्यासह यावल नगरसेवकाचा समावेश आहे. 

दरम्यान आज पासुन संपुर्ण जिल्ह्यासह यावल तालुक्यात ही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अत्यंत कडक र्निबध लागु केले आहेत. आज तालुका आरोग्य सुत्राकडुन मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर परिसरातुन एक महीला तर बाबानगर परिसरातुन एक महीला तर महसुलच्या एका मोठ्या अधिकाऱ्याचा आज मिळुन आलेल्या शहरातील ३ पॉझीटीव्ह रुग्णांमध्ये समावेश आहे. तालुक्यात आज मिळुन आलेल्या रुग्णांची संख्या हे ४० असुन यात १७ महिलांचा आणी २३ पुरूषांचा समावेश आहे. 

तालुक्यात आजपर्यंत जवळपास अकरा महीन्यांच्या कालावधीत कोरोना पॉझीटीव्ह मिळुन आलेल्या रूग्णांची एकुण संख्याही १७०० च्या जवळ पहोचली आहे. आज (दि.१६ मार्च) रोजी फैजपुर शहरात ६ न्हावी येथे ९ हिंगोणा प्राथमिक आरोग्य केन्द्राअंतर्गत सांगवी गावात सर्वाधीक ११ पॉझीटीव्ह रुग्ण मिळुन आले असुन, यावल शहर ३ भालोद २ बोरावल खुर्द ३ निमगाव ३ शिरसाड १ अट्रावल ३ रुग्ण मिळुन आल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमन्त बऱ्हाटे, यावल ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला यांनी दिली असुन, नागरीकांना अधिक सर्तक राहुन शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

 

Exit mobile version