Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आयटीआयच्या विविध विभागातून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ संपन्न

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  येथील श्री गणेश औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आयटीआयच्या विविध विभागातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ करण्यात संपन्न झाला.

आयटीआयच्या सभागृहात श्री औद्यौगाक प्रशिक्षण केन्द्राचे संस्थापक अध्यक्ष व प्राचार्य तुषार धांडे यांच्या अध्यक्षतेखाली दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले.  यावेळी प्रमुख पाहुणे  म्हणून राष्ट्रवादी युवकचे तानुकाध्यक्ष ॲड. देवकांत पाटील, छत्रपती फाऊंडेशनचे हेमंत दांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे शिक्षक व सर्व कर्मचारी यांचे सह सर्व विद्यार्थी या दिक्षांत कार्यक्रमास उपस्थित होते.

 

 

भारत सरकार अंतर्गत केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजक मंत्रालयाकडून प्रथमच देशभरात आयटीआयच्या वतीने विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ घेण्यात निर्णय घेण्यात आले आहे त्याच अनुषंगाने यावल येथील श्री गणेश औद्योगिक प्रशिक्षण केंद्राने यावर्षी प्रथमच  हा उपक्रम राबविण्यात आला. शैक्षणिक वर्ष २०२०-२०२२ या द्वितीय वर्षातील इलेक्ट्रिशियन ट्रेड प्रथम क्रमांक – गौरव समाधान पाटील, द्वितीय क्रमांक – निलेश दिलीप विचवे व तृतीय क्रमांक – राहुल भोई तसेच फिटर ट्रेड मधूल पहिला क्रमांक – कुणाल पाटील.  तसेच वर्ष २०२१-२०२२ या प्रथम वर्षात इलेक्ट्रिशियन ट्रेड मधून पहिला क्रमांक – हेमंत गणेश महाजन, द्वितीय क्रमांक उज्ज्वल दिलीप निळे, तृतीय क्रमांक – तुषार निलेश धांडे (किनगाव). तसेच प्रथम वर्षात फिटर ट्रेड मधून निकिता पाटीलने प्रथम क्रमांक मिळवला.  सर्व ट्रेड मधून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक यांच्यासह सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी ॲड. देवकांत पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन कौतुक करत भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्यात. गणेश औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य तुषार धांडे  सर्व यशाबद्दल कौतुक करत त्यांनी घेतलेले मेहनत परिश्रमाचे फळ असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात प्राचार्य तुषार धांडे यांनी विद्यार्थी हा आपला केंद्रबिंदू असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात अष्टपैलू कामगिरी करता यावी यासाठी आपले प्रशिक्षण केंद्र नेहमी विद्यार्थ्यांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे व या पुढेही देत राहील अशी ग्वाही दिली. यशस्वीतेसाठी आयटीआय तील सर्व  शिक्षक वसीम तडवी , धीरज साळुंके ,योगेश ठाकूर राकेश पाटील देवेश धांडे , जीवन भारुडे  कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version