Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोदवड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दीक्षांत सोहळा

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी  | येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये    रविवारी दीक्षांत समारंभ सोहळा व पीएम रन स्किल अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाल्या.

 

दीक्षांत समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी औद्योगिक प्रशिक्षण संस्था व्यवस्थापन समितीचे चेअरमन हरीओम जयस्वाल हे होते. व्यासपीठावर नाडगाव ग्रामपंचायत च्या सरपंच अश्विनी कुरपाडे, मुक्ताईनगर पत्रकार संघाचे सचिव संदीप जोगी, श्री कुरपाडे,  संस्थेचे गट निदेशक  ए. जे. कोल्हे उपस्थित होते.

 

दीक्षांत समारंभ कार्यक्रमांमध्ये बोदवड शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून सर्व शाखांमधून  प्रथम क्रमांकाने फिटर शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थी वेदांत संदीप जोगी याचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव व सत्कार करण्यात आला. तसेच कारपेंटर शाखेतील संस्थेमधील प्रथम  ऋषिकेश पाटील, द्वितीय क्रमांकाने रूपाली सोनवणे, इलेक्ट्रिशियन शाखेतील प्रथम हर्षाली बरहाटे या विद्यार्थ्यांचाही गौरव व सत्कार करण्यात आला.

 

सकाळच्या सत्रात  संस्थेमध्ये पीएम रन स्किल अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेचे उद्घाटन बोदवडचे योगपंडित उद्योजक जगदीश खंडेलवाल यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेमध्ये ७२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाने तुषार चिंतामण भोई, द्वितीय मिलिंद लक्ष्मण चिखलकर, तिसरा महेश बारी तसेच मुलींमध्ये प्रथम पुनम सुधाकर सोनवणे , द्वितीय रोहिणी सुनील पाटील , तिसरा क्रमांक रत्ना बाळू मनोरे या विद्यार्थ्यांनी पटकावला. सोहळ्याप्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

 

यावेळी मार्गदर्शन करताना आयटीआय चे गट निदेशक  ए. जे.  कोल्हे यांनी महाराष्ट्र शासन व एन सी व्ही टी यांचे मार्फत रविवारी संस्थेमध्ये मॅरेथॉन स्पर्धा व दीक्षांत समारंभ सोहळा संपन्न झाला प्रशिक्षणार्थी विद्यार्थी यांचे हार्दिक अभिनंदन करीत विद्यार्थ्यांनी पुढील यश संपादन करा. आपणास मिळालेले कौशल्य भविष्यात बळ देणार असून कौशल्य आत्मसात करा शिकाऊ काळात आपणास भरपूर शिकायला मिळणार आहे तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल चांगले, उद्योजक तसेच नोकरी व्यवसायात आपण नाव कमवावे असे सांगितले.

 

शासकीय आयटीआय बोदवडचे प्राचार्य अरविंद चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली गटनिदेशक ए जे कोल्हे , फिटर निदेशक एम वाय पूनासे , चित्रकला निदेशक ए एस साळुंखे,  ड्रेस मेकॅनिक निवेशिका सौ एस ए पाटील, निदेशक के. जे. सोनवणे, मुख्य लिपिक ए. बी. साळवे, वरिष्ठ लिपिक व्हीं. बी. सोनवणे, व्हि. एस. मोरे, व्ही. पी. भालेराव, भंडारपाल प्रदीप चौधरी, सर्व तासिका निदेशक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, कर्मचारी यांचे सह विद्यार्थी विद्यार्थिनी पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन निदेशक के. जे. सोनवणे यांनी केले.

 

फिटर या शाखेमध्ये शिक्षण घेत असताना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बोदवड येथील प्राचार्य ,गटनिदेशक ,सर्व शिक्षक तसेच फिटरचे निदेशक एम. वाय. पुनासे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. भविष्यात दोन वर्षांमध्ये मिळालेल्या प्रशिक्षणाचा नक्कीच फायदा होईल असे मत संस्थेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थी वेदांत जोगी याने सांगितले.

Exit mobile version