Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोगद्यामुळे होणाऱ्या अपघातास संबंधित ठेकेदार जबाबदार !

यावल प्रतिनिधी । येथील नगर परिषदच्या कार्यक्षेत्रातील फैजपूर बुऱ्हाणपुर अंकलेश्वर मार्गावर हॉटेल पुर्णब्रम्ह जवळ मोठा बोगदा पाडला. यामुळे अपघात होण्याची शक्यता असुन या अप्रीय घटनेस संबधीत ठेकेदार व नगर परिषद जबाबदार राहील अशी लेखी तक्रार शिवसेनेचे उपशहर प्रमुख संतोष खर्चे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. 

या संदर्भात शिवसेने संतोष खर्चे यांनी दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की, यावल शहरातील फैजपुर रोडावर असलेल्या हॉटेल पुर्णब्रम्ह जवळ एका बांधकाम ठेकेदाराच्या वतीने यावल नगर परिषद वा कोणत्याही विभागाकडुन कुठलीही परवानगी न घेता प्रमुख रहदारीच्या व वर्दळीच्या रोडाच्या खालुन बोगदा पाडल्याने त्या ठीकाणी पोकळ निर्माण झाल्याने भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता असुन या मार्गावर काही एक अपघात किंवा अप्रीय घटना घडल्यास सर्वश्री जबाबदारी यावल सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय व यावल नगर परिषद आणी ठेकेदाराची राहील.  तरी या संदर्भात वरीष्ठ अधिकारी यांनी तात्काळ या कामाचा ठेकेदार आणी अधिकारी यांच्यावर शासनाने परवानगी न घेता मुख्य मार्गावर बोगदा पाडल्याने त्याच्या रितसर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे उपशहरप्रमुख संतोष खर्चे यांनी उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग यावल यांच्याकडे केली असुन याबाबतची माहीती राज्याचे सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी जळगाव आणी रावेर यावलचे आमदार शिरीष चौधरी केली आहे.

Exit mobile version