Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुटखा वाहतूक करणारे कंटेनर पकडले; बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गुटख्याची होणारी तस्करी रोखत सुमारे ५६ लाख ९२ हजार ४८० रूपयांचा गुटखा जप्त केल्याची कारवाई रविवारी २० ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता केली. विशेष म्हणजे कंटनेरमध्ये सुरूवातील लहान मुलांचे चॉकलेट व जेम्सचे खोके रचून त्याआड गुटख्याची तस्करी केली जात होत होती. याप्रकरणी सोमवारी २१ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजून ११ मिनीटांनी भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कंटेनर चालकाला अटक करण्यात आले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी कंटेनर (क्रमांक यु.पी.78 सी.एन.5698) मधून गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी लावली. रविवारी २० ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता नाहाटा चौफुलीजवळ कंटेनर आल्यानंतर ट्रकची झडती घेतली असता त्यास चॉकलेट बॉक्सच्या आड राजनिवास मानमसाल्याची वाहतूक होत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर कंटेनर भुसावळ पोलीस उपअधीक्षक कार्यालयात लावण्यात आला. अन्न व सुरक्षा विभागाला पत्र दिल्यानंतर संबंधित विभागाचे अधिकारी न आल्यानंतर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात पोकॉ प्रशांत सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनर चालक जगदीश मांगिलाल श्रीवास्तव (वय-४८) रा. इंदौर, मध्यप्रदेश याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीसांनी ५६ लाख ९२ हजार ४८० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहे.

Exit mobile version