Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हिंगणे येथे विद्यूत उपकेंद्राच्या कामाचे आ. चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते भूमीपूजन

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील हिंगणे येथे ४ कोटी २३ लाख रूपयांच्या निधीचे ३३/११ केव्ही विद्यूत उपकेंद्राचे भूमीपूजन आमदार चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते गुरूवारी करण्यात आले.

बोदवड उपकेंद्रातून आमदगांव, हिंगणा , शिरसाळा, कोल्हाडी  नाडगांव,  नांदगाव , सोनोटी या गावांना वीजपुरवठा होतो.  बोदवड उपकेंद्रातून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढत असल्याने शेतकरी वर्गासहित गावकऱ्यांना या अडचणीचा सामना करावा लागत होता. रब्बी हंगामात विजेची मागणी वाढल्याने बोदवड उपकेंद्रावर अतिरिक्त भार येउन वारंवार विज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढत होते. यासंदर्भात , शेतकर्यांनी हि समस्या सोडविण्याबाबत आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांच्याकडे मागणी केली होती. आता , बोदवड उपकेंद्रातून आमदगांव, हिंगणा , शिरसाळा, कोल्हाडी  नाडगांव,  नांदगाव , सोनोटी हि गावे वगळून हिंगणे येथे स्वतंत्र 33/11 केव्ही उपकेंद्राचे काम सुरु झाल्याने परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांचा सत्कार केला.

Exit mobile version