Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पालिकेच्या बांधकाम अभियंत्यास मारहाण प्रकरणी एकास अटक (व्हीडीओ)

4b4689d8 808a 402a 87c0 153242a7bebd

एरंडोल (प्रतिनिधी) येथील पालिका कार्यालयात बांधकाम अभियंत्यास शिवीगाळ व मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. दरम्यान, आरोपीच्या अटकेसाठी पालिका कर्मचाऱ्यांंनी आंदोलन केले. या प्रकरणामुळे काही वेळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

 

पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, नगरपालिकेचे बांधकाम अभियंता देवेंद्र अशोक शिंदे हे बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास कार्यालयात कामकाज करीत होते. त्याच वेळेस सुनिल मुरलीधर मानुधने हे शिंदे यांच्या कार्यालयात आले. तसेच त्यांनी दिलेल्या माहितीच्या अधिकाराबाबत मागितलेल्या माहितीची चौकशी केली. त्यावेळी बांधकाम अभियंता शिंदे यांनी तुमची माहिती तयार असून तुम्हाला दहा मिनिटात त्याची प्रत देतो, असे सांगितले. त्याचा सुनिल मानुधने याना राग आला व त्यांनी शिंदे यांच्या शर्टाची कॉलर पकडून शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर, टेबलावरील संगणकाचा की-बोर्ड उचलून शिंदे यांच्या डाव्या हातावर व पाठीवर मारला. शिंदे यांना मारहाण केल्यामुळे कार्यालयात एकाच गोंधळ उडाला. यावेळी शिंदे यांचे सहकारी विराज पवार, भुषण चौधरी, निलेश चव्हाण, कैलास महाजन, योगेश सुकटे यांनी सुनिल मानुधने व देवेंद्र शिंदे यांच्यातील वाद मिटविला. त्यानंतर बांधकाम अभियंता देवेंद्र शिंदे यांनी मुख्याधिकारी किरण देशमुख यांना झालेल्या घटनेची माहिती दिली.

 

 

बांधकाम अभियंता देवेंद्र शिंदे यांना मारहाण झाल्याचे समजताच सर्व पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मारहाणीचा निषेध करून पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा काढत सुनिल मानुधने यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. जोपर्यत सुनिल मानुधने यांच्याविरुद्ध कारवाई केली जात नाही, तोपर्यत काम बंद आंदोलन करण्याची भुमिका कर्मचारी यांनी घेतली होती. सायंकाळी अभियंता देवेंद्र शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून एरंडोल पोलीस स्थानकात सुनिल मुरलीधर मानुधने यांच्याविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हर्शल कुलकर्णी हे करीत आहे. दरम्यान सुनिल मानुधने यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे समजताच त्यांच्या समर्थक व विरोधकांनी पोलीस स्थानकात मोठी गर्दी केली होती. परंतु अखेर पोलिसांनी सुनिल मानुधने यांना अटक केली.

 

Exit mobile version