Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोलाणी मार्केटमधून बांधकाम ठेकेदाराची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरातील बांधकाम ठेकेदाराची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी २५ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी मंगळवारी २६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जितेंद्र अरूण घुगे (वय-३५) रा. चिंचोली ता.जि.जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बांधकाम ठेकेदारीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. सोमवारी २५ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारा जितेंद्र घुगे हा तरूण त्यांची दुचाकी (एमएच १९ बीटी ७१७) ने  जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरात आलेला होता. काम आटोपून साडेआठ वाजता दुचाकीजवळ आला असता त्याला जागेवर दुचाकी मिळून आली नाही. म्हणून त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. मंगळवारी २६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव धेवून तक्रार दिली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गजानन बडगुजर करीत आहे.

Exit mobile version