Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आमदार शिरीष चौधारींकडून नेहते कुटुंबाचे सांत्वन

 

 

यावल,  प्रतिनिधी । कोरपावली येथील काँग्रेस पक्षाचे जेष्ठनेते व मसाकाचे संचालक मार्गदर्शक स्व.बारसु रामदास नेहेते यांचे काल अल्पशा आजाने निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे  आमदार  शिरीष मधुकरराव चौधरी सांत्वन  यांनी केले.

 

आमदार शिरीष चौधरी यांनी स्व. बारसु रामदास नेहेते यांनी केलेल्या समाजकारण , राजकारण व शेतकऱ्यांसाठी केलेल्या निस्वार्थ सेवेच्या आठवणीना उजाळा दिला.   याप्रसंगी बारसू नेहते यांचे  चिरंजीव संदीप  नेहेते व त्यांचे पुतणे उमेश नेहेते यांच्या सोबत माहिती घेऊन त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी परिवारातील सदस्य नातेवाईक उपस्थित होते.  बारसु भाऊंनी तालुक्यासाठी गावासाठी केलेल्या  विकास कामांचा तसेच सहकार क्षेत्रात तसेच मसाकाच्या  प्रत्येक अडचणीत त्यांच्या अनुभव खूप कामे यायचा तो अनुभव सांगून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.   त्यांचा अशा अचानक आपल्यातुन निघुन जाण्याने पक्षाचे, तालुक्याचे, गावचे खूप मोठे नुकसान झाल्याचे आ. चौधरी यांनी भावना व्यक्त केली. याप्रसंगी आमदार शिरीष चौधरी यांच्या सोबत जिल्हा परिषद गटनेते  प्रभाकर अप्पा सोनवणे,  जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शेखर सोपान पाटील , धनंजय चौधरी, इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, कदिर खान, कोरपावलीचे सरपंच विलास अडकमोल, माजी सरपंच जलील पटेल, सामाजिक कार्यकर्ते मुक्तार पिरण पटेल, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी उमेश जावळे, प्रवीण अडकमोल, रईस पटेल, अविनाश अडकमोलसह आदी उपस्थित होते.

 

Exit mobile version