Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूर सरकारची नामंजूरी !

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | काँग्रेसच्या  भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात होण्यापूर्वीच ग्रहण लागले आहे. राहुल गांधीच्या यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात 14 जानेवारीपासून मणिपूर राज्यातून होणार होती. परंतू मणिपूर राज्यातील सध्याची कायदा सुव्यवस्था पाहाता मणिपूरच्या मुख्यमंत्री एन.बीरेन सिंह यांनी यात्रेला परवानगी देण्यास नकार दिला आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरच्या इम्फाळ येथील पॅलेस ग्राऊंड येथून सुरु होणार होती. मणिपूर येथील सध्याची परिस्थिती पाहून राहुल गांधी यांनी मणिपूर सरकारने परवानगी न दिल्याने आता त्यांना दुसऱ्या ठिकाणाहून आपली भारत जोडो न्याय यात्रा सुरु करावी लागणार आहे.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांच्या निकालानंतर पुन्हा आपली पदयात्रा सुरु करण्याची घोषणा केली होती. यावेळी ही पदयात्रा मणिपूर येथून सुरु होऊन मुंबईत तिचा समारोप होणार आहे. या यात्रेला आधी न्याय यात्रा असे नाव दिले होते. त्यानंतर तिचे नाव बदलून ‘भारत जोडो, न्याय यात्रा’ असे ठेवण्यात आले आहे. ही पदयात्रा 14 जानेवारीला मकरसंक्रातीच्या दिवशी सुरु होऊन 20 मार्च रोजी तिचा समारोप होणार आहे. मणिपूर येथून यात्रेला परवानगी नाकारण्याचा राज्य सरकारचा निर्णय दुर्भाग्यपूर्ण असल्याचे मणिपूर प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष कीशम मेगाचंद यांनी म्हटले आहे. आम्ही मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांची भेट घेतली. आणि इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील हट्टा कांगेजेइबुंग येथून यात्रेची परवानगी मागितली. येथे एक सभा झाल्यानंतर यात्रेला हिरवा झेंडा दाखविला जाणार होता. परंतू मुख्यमंत्र्यांनी परवानगी देण्यास नकार दिल्याचे मेगाचंद्र यांनी सांगितले.

आम्हाला या यात्रेतून काही राजकारण करायचे नाही. आम्हाला मणिपूरचा काही मुद्दा करायचा नाही. ही एक शांततापूर्ण यात्रा आहे. ही यात्रा आम्ही भारताच्या लोकांसाठी काढत आहोत. विशेष करून मणिपूरच्या लोकांसाठी ही यात्रा आहे. हा काही हिंसा मार्च नाही. आम्ही सरकारला सहकार्य करतोय याचा अर्थ असा नाही की त्यांनी आमची यात्राच रोकावी असा सवाल कॉंग्रेसचे महासचिव के.सी.वेणुगोपाल यांनी म्हटले आहे.

Exit mobile version