Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काँग्रेस विरोधात बसणार- खर्गे

जयपूर वृत्तसंस्था । महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष शिगेला पोहचला असतांना काँग्रेसचे राज्य प्रभारी मल्लीकार्जुन खर्गे यांनी आपला पक्ष विरोधात बसणार असल्याचे वक्तव्य केले आहे.

काँग्रेसच्या आमदारांना जयपूर येथील सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. येथे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आमदारांशी वार्तालाप केला. यात बहुतेक आमदारांनी शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत अनुकुल मत व्यक्त केले. तथापि, पक्षाचे राज्य प्रभारी मल्लीकार्जुन खर्गे यांनी मात्र आपला पक्ष विरोधात बसणार असल्याचे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, जनतेने आम्हाला विरोधात बसण्यासाठी कौल दिला असून आम्ही यानुसार विरोधकांची भूमिका बजावणार आहोत. मात्र याबाबत पक्षश्रेष्ठी हेच अंतिम निर्णय घेणार असल्याची पुस्ती त्यांनी जोडली. यामुळे आता शिवसेनेला पाठींबा देण्याचा निर्णय हा सर्वस्वी काँग्रेसच्या हायकमांडवर अवलंबून असेल असे स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version