Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘त्या’ वादग्रस्त पुस्तकाच्या विरोधात काँग्रेसचे उद्या आंदोलन

balasaheb thorat

मुंबई प्रतिनिधी । पंतप्रधान मोदी यांची शिवाजी महाराजांशी तुलना करणार्‍या पुस्तकाच्या विरोधात कॉग्रेस पक्षातर्फे मंगळवारी (दि.१४) राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा आज महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या पुस्तकाला विरोध करताना थोरात म्हणाले की, ”छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. छत्रपतींच्या नावाने मते मागून सत्तेवर आलेल्या भाजपाकडून छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदींशी करण्याचा खोडसाळपणा सुरू आहे. या अगोदरही अजयकुमार बिष्ट आणि विजय गोयल यांनी नरेंद्र मोदींची तुलना शिवरायांशी करण्याचा प्रयत्न केला होता, आताही ‘आजके शिवाजी :नरेंद्र मोदी’ या पुस्तकातून छत्रपतींचा अवमान केला आहे. शिवरायांचा वारंवार अवमान करणाऱ्या भाजपाविरोधात मंगळवारी राज्यभर आंदोलन करुन तीव्र निषेध केला जाणार आहे.”

उद्या सकाळी ११ वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, टिळक भवन, मुंबई येथे भाजपाविरोधात मी स्वतः कार्यकर्त्यांसह आंदोलन करणार असून राज्यातील सर्वच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हा व तालुकास्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या भाजपाविरोधात तीव्र आंदोलन करतील,” असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.

Exit mobile version