Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काँग्रेस सोशल मिडीया विभाग अध्यक्षपदी अभय महाजन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  तालुक्यातील कोळवद चे रहीवासी व भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे तरूण निष्ठावंत कार्यकर्ते अभय महाजन यांची पक्षाच्या रावेर विधानसभा क्षेत्र सोशल मिडीया अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

 

छत्रपती संभाजी नगर  येथील हॉटेल एमएच २०च्या सभागृह येथे  सत्याग्रह कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यशाळेत संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील काँग्रेस पक्षाच्या सोशल मिडिया विभागाचे जिल्हा अध्यक्ष प्रामुख्याने उपस्थित होते . महाराष्ट्र काँग्रेस कमेटीच्या सोशल मिडीया विभागाचे प्रदेश अध्यक्ष विशाल मुत्तेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या सत्याग्रह कार्यशाळा बैठकीत कोळवद तालुका यावल येथील काँग्रेसचे तरूण निष्ठावंत कार्यकर्ते अभय महाजन यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सोशल मिडीया विभागाच्या रावेर विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .

 

अभय महाजन यांची निवड झाल्याबद्दल कॉंग्रेस पक्षाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार , पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आमदार शिरीष चौधरी, यावल तालुकाध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे , माजी पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील ,प्रदेश प्रतिनिधी उमेश जावळे , प्रदेश कार्यकारणीचे पदाधिकारी जलील पटेल , पंचायत समितीचे माजी सभापती लिलाधर चौधरी , काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, अनुसुधित जाती विभागाचे तालुका अध्यक्ष अनिल जंजाळे ,दहिगावचे सरपंच अजय अडकमोल, वढोदे सरपंच संदीप सोनवणे , खरेदी विक्री संघाचे चेअरमन अमोल भिरूड, माजी नगरसेवक असलम शेख नबी ,समिर शेख मोमीन,मनोहर सोनवणे, धिरज कुरकुरे, विक्की पाटील,अल्ताफ तडवी ,अमर कोळी यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले आहे.

Exit mobile version