Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लोकशाहीसाठी काँग्रेस पक्ष मजबूत असणे आवश्यक – नितीन गडकरी

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । “लोकशाहीसाठी काँग्रेस पक्ष मजबूत असणे आवश्यक असून सलग निवडणुकीत पराभूत होणारी काँग्रेस पुन्हा मजबूत होऊन पक्षाचे नेत्यांनी निराश होऊन पक्ष सोडू नये.” अशी आपली इच्छा असल्याचं वक्तव्य नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात केलं होतं. ते चर्चेचा विषय ठरत आहे.

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. आता त्यांनी काँग्रेसबद्दल वक्तव्य केलंय. “लोकशाहीसाठी काँग्रेस पक्ष मजबूत असणे आवश्यक आहे. सलग निवडणुकीत पराभूत होणारी काँग्रेस पुन्हा मजबूत व्हावी आणि पक्षाचे नेते निराश होऊन पक्ष सोडू नयेत, हीच आपली इच्छा आहे. काँग्रेस पक्ष कमकुवत होत असून देशातील मुख्य विरोधी पक्षाची जागा प्रादेशिक पक्ष घेत आहेत, हे चांगले लक्षण नाही,” असं मत एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं होतं

एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, ‘सत्ताधारी आणि विरोधक या दोन चाकांवर लोकशाही चालते. त्यामुळे प्रबळ विरोधी पक्ष ही लोकशाहीची गरज असून काँग्रेस मजबूत असावी अशी माझी इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेस कमकुवत होत असून प्रादेशिक पक्ष त्याचे स्थान घेत आहेत. हे लोकशाहीसाठी चांगले नाही. विरोधी पक्षाची जागा घेण्यासाठी काँग्रेस मजबूत झाला पाहिजे.” अशी इच्छा व्यक्त करत पराभवानंतर निराश न होता पक्षासोबत रहा असं आवाहन कार्यक्रमाप्रसंगी गडकरी यांनी काँग्रेस नेत्यांना केलं.

Exit mobile version