Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कॉंग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

चंद्रपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | येथील कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे आज पहाटे निघन झाले. उपचार सुरू असतांना त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला.

चंद्रपूरचे कॉंग्रेस खासदार बाळू धानोरकर (वय ४७ ) यांची प्रकृती अलीकडेच बिघडली होती. स्थानिक रूग्णालयात उपचार उपलब्ध नसल्याने त्यांना नवी दिल्लीतील मेदांता हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. येथेच उपचार सुरू असतांना त्यांनी आज पहाटे शेवटचा श्‍वास घेतला.

बाळू धानोरकर यांचे पार्थिव दुपारी वरोरा येथे आणलं जाणार असून उद्या ३१ मे रोजी त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. बाळू धानोरकर हे आधी शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख होते. त्यानंतर ते कॅाग्रेसमध्ये गेले आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार झाले. राज्यात कॉंग्रेसचेचे एकमेव खासदार होते. अतिशय करूण बाब म्हणजे चार दिवसांपूर्वीच बाळू धानोरकरांचे वडील नारायण धानोरकर यांचं निधन झालं होते. या नंतर लागलीच त्यांचेही निधन झाल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे. तर राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Exit mobile version