Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांचा आज शिवसेनेत प्रवेश

abdul sattar

 

मुंबई (वृत्तसंस्था) काँग्रेसचे बंडखोर नेते माजी आमदार अब्दुल सत्तार यांचा शिवसेना पक्ष प्रवेश निश्चित झाला आहे. सत्तर आज दुपारी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधणार आहेत.

 

अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट नाकारल्यानंतर बंड पुकारला होता. यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा देखील केली. परंतु, इतर पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी ऐनवेळी आपली उमेदवारी मागे घेतली. यानंतर त्यांनी भाजप नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली होती. परंतू आता अचानक सत्तार यांनी शिवसेना प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या पक्ष प्रवेशासाठी सत्तार आपल्या समर्थकांसह मुंबईत पोहोचले आहेत.

Exit mobile version