Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामनेर विकासो निवडणूकीत काँग्रेस भाजपासोबत नाही – एस.टी.पाटील

जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जामनेर विकास निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस अशा तिघे पक्षांची महाविकास आघाडीचे संयुक्त ‘शेतकरी पॅनल’ ही निवडणूक लढवत असून निवडणूकीत काँग्रेस कुठल्याही परिस्थितीत भाजपासोबत जाणार नसून महाविकास आघाडी ही निवडणूक लढवीत असल्याचे या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे तालुकाध्यक्ष एस.टी.पाटील यांनी सांगितले.

तथाकथित तालुकाध्यक्षांनी कुणाचीही विचारविनिमय न करता भाजपा सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला जिल्हाध्यक्ष यांनीही कठोर विरोध केला असून आम्ही कुठल्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही. असे प्रतिपादन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष एस.टी.पाटील यांनी सुधाकर सराफ यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केले.

या पत्रकार परिषदेला महा विकास आघाडीचे घटक पक्षाचे नेते शिवसेनेचे तालुका संघटक सुधाकर से सराफ राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. वंदनाताई चौधरी जिल्हा बँकेचे संचालक नाना राजमल पाटील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष एस टी पाटील उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांना माहिती देताना शिवसेनेचे तालुका संघटक सुधाकर सराफ म्हणाले की, “ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शिवसेना ३ राष्ट्रवादी ३ काँग्रेस ३ भाजप ४ असा प्रस्ताव आम्ही ठेवला. परंतु तो मान्य केला नाही म्हणून महाविकास आघाडीने ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्या हस्ते उद्या प्रचार  नारळ वाढविणार असून मोठ्या बहुमताने आमच्या उमेदवार निवडून येतील असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष वंदनाताई चौधरी म्हणाल्या की, “विरोधकांत तर्फे मोठ्या प्रमाणावर पैशांचे आमिष मतदारांना दाखविले जाईल. मात्र मतदारांनी त्याला बळी न पडता महाविकास आघाडीच्या उमेदवारास मतदान करावे. राज्यात महाआघाडी शासन असून आघाडीचे पॅनल विजयी झाल्यास  शेतकऱ्यांसाठी विविध योजनांचा लाभ त्यांना देण्यात येईल.

या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे तालुका संघटक सुधाकर सराफ, एडवोकेट प्रकाश पाटील,  युवा सेनेचे उप जिल्हा प्रमुख विश्वजीत पाटील, शहर प्रमुख अतुल सोनवणे, नाना जंजाळ, उपशहर प्रमुख कैलास माळी, युवासेना माजी उप जिल्हाध्यक्ष अॅड.भरत पवार उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष वंदनाताई चौधरी, प्रल्हाद बोरसे, हिम्मत राजपूत, कळमसरा सरपंच अशोक दादा चौधरी, जिल्हा बँक संचालक नाना पाटील, शहराध्यक्ष पप्पू पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष एस.टी.पाटील, गणेश झाल्टे, माजी युवा तालुकाध्यक्ष किरण पाटील, किशोर तायडे, जितू झाल्टे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

जामनेर विकास व निवडणूकीत महाविकास आघाडीने .शेतकरी पॅनल. स्थापन केले असून या पॅनलला ‘छत्री’ हि निशाणी मिळाली आहे.

 

जामनेर वि.का.सो. निवडणुकीत महाविकास आघाडी स्थापित ‘शेतकरी पॅनेल’तर्फे सर्वसाधारणमधून सुधाकर दौलत सोनार, हिम्मत भारत राजपूत, पांडुरंग शामराव सोनवणे, कविता प्रल्हाद बोरसे, प्रवीण वसंत महाजन, रमेश भाऊराव पाटील, प्रमोद जगन्नाथ टहाकळे, वि.जा.मधून सुनील नामदेव धनगर, महिला राखीव शेख अकतरबी उस्मान, लिलाबाई विश्वनाथ महाजन आदीब उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.

Exit mobile version