Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कॉंग्रेस आम्हाला भाव देत नाही – केजरीवाल


नवीदिल्ली (वृत्तसंस्था) ‘युतीसाठी मी काँग्रेसला अनेकदा विनवण्या करून थकलो. पण ते प्रतिसादच देत नाही,’ अशी खंत दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे नेते केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे.

पुरानी दिल्लीतील जामा मशीद परिसरात एका सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
आगामी लोकसभा निवडणुकीत दिल्तीत भाजपला चीत करण्यासाठी काँग्रेस व आपनं एकत्र यावं यासाठी केजरीवाल बऱ्याच दिवसांपासून प्रयत्नशील आहेत. मात्र, काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याकडं पूर्णपणे कानाडोळा केला आहे. ‘आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपची मतं १० टक्क्यांनी कमी होतील. काँग्रेस आणि आप दिल्लीतील सात लोकसभेच्या जागांवर एकत्र लढल्यास मतांचे विभाजन होणार नाही. इतकंच नव्हे तर भाजपला दिल्लीत एकही जागा जिंकता येणार नाही, असं केजरीवालांना वाटतं. मात्र, काँग्रेस माझ्या प्रस्तावाचा गांभीर्यानं विचारच करत नाही. मत विभाजन झाल्यास त्याचा फायदा भाजपलाच होणार आहे,’ असं केजरीवाल म्हणाले.

Exit mobile version