Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘कांताबाई जयंती’ निमित्ताने एसटी कर्मचाऱ्यांना स्नेहाची शिदोरी

जळगाव प्रतिनिधी | कांताबाई जैन यांच्या ८४ व्या जयंती आणि कांताई नेत्रालयाच्या सहाव्या वर्धापन दिनाच्या औचित्याने एसटी कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात ‘स्नेहाची शिदोरी’ देण्यात आली.

“आपल्या अडचणी आपल्या स्वतःलाच सोडवाव्या लागतात, परंतु अडचणीत असलेल्या व्यक्तींना आपल्यापरीने मदत करुन त्याचे दुःख कमी करणे ही खरी मदत होय” अशी शिकवण आई कांताई यांनी आम्हाला दिली. जैन इरिगेशनच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांना ‘स्नेहाची शिदोरी’ नक्की उपयोगी ठरेल. असे जैन इरिगेशनचे महाराष्ट्र विपणन प्रमुख अभय जैन यांनी यांनी सांगितले

छोटेखानी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर डॉ. अंतरिक्ष महातो, डॉ. डॉली रणदिवे, एसटी कर्मचारी विजय पाटील उपस्थित होते. आरंभी कांताबाई जैन यांच्या स्मृतींना मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आले. जैन इरिगेशनचे सहकारी अनिल जोशी यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात स्नेहाच्या शिदोरी उपक्रमाबाबत सांगितले.

यावेळी अभय जैन, डॉ. अंतरिक्ष, डॉ. रणदिवे, अमर चौधरी, अनिल जोशी, किशोर कुळकर्णी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्नेहाची शिदोरी वितरीत करण्यात आली. अमर चौधरी यांनी कांताई नेत्रालयाच्या सहा वर्षांच्या प्रगती व केलेल्या कार्याबाबत उपस्थितांना माहिती दिली. शिदोरी घेणाऱ्या कुटुंबियांच्या वतीने श्रीमती यशोदा पांढरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी मोठे भाऊ भवरलालजी जैन यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Exit mobile version