विद्युत वितरण कंपनीच्या निविदा प्रक्रियेत घोळ ? – पाचोरा अधीक्षक अभियंता संशयाच्या भोवऱ्यात

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | विद्युत वितरण कंपनीच्या जळगाव परिमंडळातील पाचोरा विभागात व्यावसायिक व औद्योगिक मीटर रिडींग निविदा प्रक्रियेत गैरप्रकार झाला असल्याची तक्रार समोर आली आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या जळगाव परिमंडळातील पाचोरा विभागात व्यावसायिक व औद्योगिक मीटर (पी.सी.झिरो) रिडींग निविदा प्रक्रियेत गैरप्रकार झाला असल्याची तक्रार समोर आली असून कंपनीचे नियम डावलून मर्जीतील ठेकेदारांना लाभ पोहचवण्यासाठी येथील कार्यकारी अभियंत्यांनी प्रताप केल्याची तक्रार पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे महानगर प्रमुख यांनी केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, “महावितरणच्या जळगाव परिमंडळात सात विभागीय कार्यालये असून या पैकी सहा विभागांनी वृत्तपत्रात जाहिरात देऊन निविदा प्रक्रिया पूर्ण केली. मात्र पाचोरा विभागाने मात्र वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध न करता निविदा काढली आहे.

निविदा रक्कम कमी असेल तर विभागीय अभियंता यांची परवानगी अनिवार्य आहे. मात्र नियमांना फाटा देत परस्पर झालेली निविदा प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. त्यामुळे पाचोरा उपविभागाने योग्य निविदा प्रक्रिया राबवावी; अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा कल्पेश मोरे यांनी पत्रकान्वये दिला आहे. निवेदनाच्या प्रति पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांना दिली असून त्यांनी यासंदर्भात दखल घेत संबंधितांना जाब विचारला असल्याची माहिती समोर आली आहे.

Protected Content