Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्स संघ निवड चाचणीचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्स 2022 चे आयोजन हरियाणा येथे करण्याचे निश्चित झाले आहे. या स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्याचे खो-खो व कबड्डी या खेळाच्या मुले व मुली तसेच बास्केटबॉलच्या मुलींचा संघ पात्र ठरला असून राज्याचा संघ निवडीसाठी या खेळाच्या स्पर्धां व निवड चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे.

जिल्हास्तरावर खो-खो या खेळाच्या क्रीडा स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन 22 ते 23 नोव्हेंबर, 2021 या कालावधीत श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे करण्यात आले असून खेळाच्या क्रीडा स्पर्धा व निवड चाचणीकरिता सहभागी संघ व खेळाडूंनी दि. 22 नोव्हेबर, 2021 रोजी सकाळी ठिक 9.00 वाजता स्पर्धास्थळी उपस्थित रहायचं आहे. तसेच जिल्हास्तरावर कबड्डी या खेळाच्या क्रीडा स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन 23 व 24 नोव्हेंबर, 2021 या कालावधीत ॲड एस. ए. बाहेती महाविद्यालय, जळगाव येथे करण्यात आले असून या खेळाच्या क्रीडा स्पर्धा व निवड चाचणीकरिता सहभागी संघ व खेळाडूंनी 23 नोव्हेंबर, 2021 रोजी सकाळी ठिक 9.00 वाजता स्पर्धास्थळी उपस्थित रहावे असे कळविण्यात आले आहे
कबड्डी खेळासाठी मुलांकरीता वजनगट 70 किलो किंवा त्यापेक्षा कमी व मुलींसाठी वजनगट 65 किलो किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच बास्केटबॉल या खेळाचे मुलींच्या क्रीडा स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन जिल्हास्तरावरुन थेट राज्यस्तरावर करण्यात येणार असून जिल्हास्तरावर 26 नोव्हेंबर, 2021 रोजी सकाळी ठिक 9.00 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. बास्केटबॉल या खेळाच्या क्रीडा स्पर्धा व निवड चाचणीतील सहभागी 18 वर्षाखालील खेळाडूमधून जिल्ह्याचा संघ राज्यस्तरावर सहभागी होण्याकरिता निवडला जाणार आहे. या स्पर्धा संघटनेच्या नियमानुसार होतील व स्पर्धेत सहभागी खेळाडुंना कोणत्याच स्तरावर प्रमाणपत्र दिले जाणार नाही.
जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना व क्रीडा मंडळे यांनी जिल्हास्तर खो खो, कबड्डी व बास्केटबॉल या खेळाच्या क्रीडा स्पर्धा व निवड चाचणीत सहभागी होण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त संघ व खेळाडुना सुचित करावे, या स्पर्धेत सहभागी होण्याऱ्या खेळाडूची जन्मतारीख 1 जानेवारी, 2003 किंवा त्यानंतरची असावी. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना व क्रीडा मंडळे यांनी खेळाडूंचे संपुर्ण नाव, जन्मदिनांक, आधारकार्ड, शालांत प्रमाणपत्र, 10 वी बोर्ड सर्टिफिकेट, जन्मप्रमाणपत्र (5 वर्षापुर्वी काढलेले) यापैकी दोन कागदपत्रे, पत्रव्यवहाराचा पत्ता व संपर्क क्रमांकासह लेटर हेडवर सही व शिक्क्यासह प्रवेशिका 20 नोव्हेंबर, 2021 पर्यंत संपूर्ण गदपत्रांसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव येथे सादर करायचा आहे. अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक मिनल थोरात यांचेशी संपर्क साधावा.असं वाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Exit mobile version