Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चौधरी बंधूंना मातृशोक : सुशीलाबाई चौधरी यांचे निधन !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माजी आमदार संतोष चौधरी व माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्या मातोश्री गं. भा. सुशीलाबाई छबीलदास चौधरी यांचे आज निधन झाले असून आज सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गं. भा. सुशीलाबाई छबीलदास चौधरी ( वय ७६) यांनी आज अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या माजी आमदार संतोष चौधरी व माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्या मातोश्री तर माजी नगराध्यक्षा रेखाताई चौधरी यांच्या सासू होत. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गं. भा. सुशीलाबाई छबीलदास चौधरी यांच्या निधनाने समाजाच्या सर्व स्तरांमधून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version