Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

घर-घर दस्तक मोहिमेद्वारे ग्रामीण भागात लसीकरण पूर्ण करा- डॉ पंकज आशिया

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  राज्यात कोरानाचे वाढते रुग्ण व नव्याने आढळून येत असलेल्या व्हेरियन्ट प्रसार प्रतिबंधात्मक पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी टास्क फोर्सची बैठक जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. पंकज आशिया यांचे अध्यक्षतेखाली साने गुरुजी सभागृहात घेण्यात आली.

 

या बैठकीत कोरोनाचा नव्याने आढळून येत असलेल्या व्हेरियन्ट प्रसारापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ग्रामीण भागात १०० टक्के लसीकरण  पुर्ण करण्यासाठी १ ते १४ जून दरम्यान घर-घर दस्तक मोहीम राबविण्याचे  निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.

 

ज्या नागरिकांनी कोरोनाचा पहिला किंवा दुसरा डोस अद्यापही घेतलेला नाही, अशा नागरिकांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण करण्याच्या दृष्टीने घर घर दस्तक मोहिमेच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सर्व्हेक्षण करून लसीकरण करण्याची मोहीम ऍक्शन मोड वर राबविण्यात यावी. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यासोबतच ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षक , आशा वर्कर यांना देखील सहभागी करून घ्यावे.  तालुका स्तरावर, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांची समिती गठीत करण्याच्या सूचना डॉ. आशिया यांनी दिल्या. या सोबतच ५ वर्षांखालील बालकांचे मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने विशेष अतिसार पंधरवाडा प्रभावीपणे राबविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने ग्रामीण भागात विशेष मोहीम राबविण्यात यावी.  एकही व्यक्ती संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरणापासून कोणीही वंचित राहणार नाही, या साठी घरोघरी जाऊन विशेष मोहीम राबविण्याचे सूचित करण्यात आले.

 

या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.टी. जमादार, जिल्हा महिला बालविकास अधिकारी देवेंद्र राऊत, शिक्षणधिकारी विकास पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे  जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे गट विकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते .

Exit mobile version