Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अजिंठा घाटातील रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करा, अन्यथा तीव्र आंदोलन – संभाजी ब्रिगेडचा इशारा

जामनेर प्रतिनिधी । अजिंठा लेणी येथील घाटातील रस्त्याचे काम गेल्या चार वर्षापासून बंद आहे. या खराब रस्त्यांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. मात्र, जिंठा घाटक रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा संभाजी बिग्रेड जिल्हा अध्यक्ष प्रभाकर साळवे यांनी शासनाला दिला आहे.

अजिंठा लेणी पासून सुरु होणाऱ्या घाट सात किलोमीटर अंतराचा असून फरदापुर पर्यंत चार पदरी रस्ता झाला तर पुढे अजिंठा पासून ते शिल्लोड पर्यंत रस्ता झाला मात्र अजिंठा घाट रस्ता गेल्या चार वर्षापासून तसाच पडून असल्यामुळे अतिशय खराब झाला आहे त्यामुळे अनेक वेळा पावसाळ्यात या ठिकाणाहून वापरणाऱ्या वाहनांमध्ये अपघात होतात तर खराब रस्त्यामुळे अनेक वाहने दरीत कोसळतात याकडे संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करताना दिसत असल्याने अशीच एक घटना शुक्रवार रोजी रात्री पाहायला मिळाली खराब रस्त्यावर भावी घाटामध्ये ट्रक पलटी झाला यावेळी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र रात्री आठ वाजेपासून सुमारे चार तास पाच ते सहा किलोमीटर अंतर ट्राफिक जाम झाले होते या ट्राफिक मध्ये एका वाहनात गरोदर महिला अडकून पडली त्यामुळे तिला फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे या गोष्टीकडे केंद्रीय सडक मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष घालावे व संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी त्याच बरोबर तात्काळ अजिंठा घाट रस्त्याचे काम सुरू करून पूर्ण करण्यात यावे जर असे झाले नाही तर जळगाव जिल्हा संभाजी ब्रिगेडतर्फे तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे आता तरी शासनाला जाग येऊन रस्त्याचे काम सुरू करा अशी मागणी आता सर्वसाधारण नागरिकांकडून होत आहे.

Exit mobile version