Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई द्यावी; शेतकरी संघटनेची मागणी

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात काही दिवसांपासून वादळी पावसाचा तडाखा पिकांना बसला आहे. प्रशासनाने तातडीने पारोळा तालुक्यात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणीसाठी पारोळा येथे शेतकरी संघटनेने मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले.

याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुका कापूस पट्टा म्हणून गणला जातो परंतु गेल्या काही दिवसापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाने ढगफुटी सदृश परिस्थिती बऱ्याच गावांना दिसत असल्याने सध्या गावागावातून बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या कापूस पिकाच्या नुकसानीचे कैफियत मांडली आहे. शेतकऱ्यांना जगावे की मरावे अशी स्थिती निर्माण झाली आहे. शासन प्रशासनाने वरील बाबींचा विचार करून झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून तलाठी व कृषी सहायकांना तसे आदेश देऊन अतिवृष्टी अनुदान व पिक विम्याचा पिक विमा कंपनीने पीक विमा मंजूर करावा असे, आशयाचे निवेदन नायब तहसीलदार मुळीक व नायब तहसीलदार शिंदे यांना देण्यात आले.

याप्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, तालुकाध्यक्ष भिकनराव पाटील, कार्याध्यक्ष अधिकार पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर पाटील, मार्गदर्शक डॉ. डी. एन. पाटील, जिजाबराव पाटील, प्रसिद्धीप्रमुख वाल्मीक पाटील, संतोष पाटील, सुनील पाटील, जगदीश मनोरे, समाधान पाटील, छावा अध्यक्ष विजय पाटील, राजाराम पाटील, निरंक पाटील, मनोज पाटील, युवराज पाटील यांच्यासह पारोळा तालुक्यातील पदाधिकारी शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

Exit mobile version