Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना सव्वा तीन कोटींची भरपाई

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नैसर्गिक आपत्तीमधील बांधितांना मदत देण्याकरिता मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल भाईदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ समिती गठीत करण्यात आली आहे.

या समितीने नुकत्याच झालेल्या बैठकीत वादळी पावसामुळे भडगावसह रावेर, भुसावळ, चोपडा, यावल, जळगाव व पाचोरा या तालुक्यातील शेतपिके व फळपिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी अनुदान मिळणेबाबत जिल्हाधिकारी जळगाव यांनी प्रस्ताव सादर केला.

या प्रस्तावाच्या अनुषंगाने ३.२५ कोटी रुपये अनुदान मंजूर करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे एकूण ३८५६ बाधीत शेतकर्‍यांना त्याचा लाभ होणार आहे,  अशी माहिती मदत  व पुनर्वसन विभागाकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version