Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आयुक्तांचा प्लॅस्टिक विक्रीवर कठोर कारवाईचा बडगा; आणखी एक कारखाना सील (व्हिडिओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी प्लॅस्टिक विक्रीवर कठोर कारवाईचा बडगा हाती घेतला असून एमआयडीसी भागातील कारखान्यावर छापा टाकून त्यांनी ५५ हजारांचा दंड वसूल केला होता. आज पुन्हा या पार्श्वभूमीवर एमआयडीसीतील डी सेक्टरमधील आणखी एक कारखाना सील करण्यात आला आहे.

एमआयडीसीमधील ‘डी ५५’ येथे येथील श्री अनिल मदनदास गेरडा यांचे मालकीच्या स्टीक पिशव्या प्लास्टीक ग्लास प्लेटच्या गोडाउनची तपासणी करण्यात आली. आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या गोडाऊनची आरोग्य व अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास तपासणी केली.

या तपासणीत फार मोठ्या प्रमाणात प्रतिबंध असलेल्या प्लास्टीक पिशव्या, प्लास्टीक ग्लास आणि प्लेट या साहित्यांचा साठा आढळून आला. यात ३० ते ३५ टन माल जप्त करण्याची कारवाई करत गोडावून सिल करण्यात आले.

ही कारवाई अतिक्रमण विभाग प्रमुख संजय ठाकूर, साजिद अली, किशोर सोनवणे, नाना कोळी,  नितीन भालेराव, आरोग्य निरीक्षक जितेंद्र किरंगे, रमेश कांबळे, यु. प्र अर्जुन पवार, मुकादम विक्की डोंगरे व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांनी केली.

 

 

 

Exit mobile version