Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आयोगाने विधानपरिषदेची निवडणूक पुढे ढकलली; शिक्षक संघटनानी केली होती मागणी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सध्या शाळांना सुट्टी असल्याने निवडणूक आयोगाने राज्यात चार विधानपरिषदेच्या चार मतदारसंघातील निवडणूकीच्या तारखा बदलल्या आहे. या मतदारसंघामध्ये मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचा तर मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदार संघाचा आहे. शाळांना सुट्टी असल्याने शिक्षक संघटनानी ही मागणी केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने या निवडणुका आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
विधान परिषदेतील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी १० जून रोजी मतदान होणार होते तर १३ जून रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार होती. विधान परिषदेमध्ये असलेल्या एकूण सदस्यांपैकी७ सदस्य हे शिक्षक मतदार संघातील तर 7 सदस्य हे पदवीधर मतदारसंघातून निवडून येतात. यातील दोन पदवीधर मतदारसंघातील आणि दोन शिक्षक मतदार संघातील आमदारांचा कार्यकाल ७ जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.

Exit mobile version