Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दहिवद येथे आदिवासी खावटी योजनेस प्रारंभ

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील आदिवासी लाभार्थ्यांना दहिवद गावात महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाच्या खावटी योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. 

तालुक्याचे आमदार अनिल पाटील व लोक संघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभाताई शिंदे, आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांच्या हस्ते सुमारे ९० लाभार्थ्यांना खावटी किट वितरणाचा शुभारंभ झाला. यावेळी तालुक्याचे आमदार तथा अनुसूचित जाती जमाती कल्याण समितीचे सदस्य अनिल पाटील यांनी नाशिक जिल्ह्यात खावटी किट मधील किराणा साहित्याची गुणवत्ता तपासल्यावर किट साहित्य बाबत समाधान व्यक्त केल्याचे सांगितले व तालुक्यातील आदिवासींना आदिवासी विकास विभागाच्या योजनांची माहिती मनोगतात व्यक्त केली. 

तसेच लोक संघर्ष मोर्चा च्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभाताई शिंदे यांनी २०१४ पासुन बंद असलेली खावटी कर्ज योजना हि २२ व २३ नोव्हेंबर २०१८ च्या लोक संघर्ष मोर्चाच्या उलगुलान मोर्चात शेतकऱ्यांच कर्ज माफ करत आहेत त्या प्रमाणे महाराष्ट्रातील सर्व आदिवासींच हि प्रतेकी २३०० रू खावटी कर्ज माफ करून नवीन खावटी योजना मिळावी यासाठी आग्रह धरला होता. खावटी कर्ज माफी चे लेखी पत्र त्याच दिवशी घेतले होते.

लोक संघर्ष मोर्चाने वेळोवेळी पाठपुरावा केल्याने आज मिळालेल्या योजनेच समाधान व्यक्त करत महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. आदिवासी लाभार्थ्यांना योजनेकरिता महत्वाचे असलेले रेशनकार्ड, जातप्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मेळावे चालू आहेत. वंचीत लाभार्थ्यांना विनामूल्य योजनेचा लाभ घेण्यासाठी हि आवाहन केले यासह आदिवासी विकास विभागाच्या शैक्षणिक व विविध योजनांची हि माहीती दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.अनिल पाटील प्रमुख पाहूणे लोक संघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभाताई शिंदे, प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे, पं. स. सदस्य विनोद जाधव, प्रविण पाटील, लोक संघर्ष मोर्चाचे विभागीय संघटक पन्नालाल मावळे, क्रूषी उ. बा. समितीचे प्रशासक एल. टी. पाटील, संदिप घोरपडे, तालुक्यातील नगरसेवका राधाबाई पवार, भाईदास भिल, नगाव चे सरपंच महेश पाटील, आदिवासी पारधी विकास परिषदेचे संजय पवार विजय पुनमचंद पारधी, समाधान पारधी, बालीक पवार, ढेकु चे रावसाहेब पवार, अमळगावचे मिलींद पाटील, बन्सिलाल पारधी, दापोरीचे हिरालाल महाराज, एकलव्य सेनेचे राज साळवी, टाकरखेडाचे ज्ञानेश्वर पाटील, दहिवदच्या मा सरपंच नंदाबाई मावळे, ग्रा पं सदस्या  हिराबाई भिल,शाळा व्यवस्थापन समितीच्या अधक्षा सिमा पारधी,  मुकेश पारधी, ज्ञानेश्वर देसले, प्रशांत सोनवणे, अजय पारधी, शिवाजी पारधी, सुनील चव्हाण सह शेकडो आदिवासी कार्यकर्ते व लाभार्थी उपस्थित होते कार्यक्रमाची शोभा वाढावी म्हणून अपेक्षा टेंट चे मालक अनिल माळी यांनी विनामूल्य सेवा दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बारेला सर, सुत्रसंचालन व्हि आर पाटील, लाभार्थींना किट वाटपाच नियोजन शिरसाठ सर, वैशाली पाटील, चारूशिला महाजन यांनी केले तर आभार गणेश तांदळे सरांनी मानले.

 

Exit mobile version