Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

“सुरभि” तर्फे दासबोध पारायणाला प्रारंभ

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । सुरभि बहुउद्देशीय महिला मंडळातर्फ दासनवमीनिमित्त नवसाच्या गणपती मंदिरात पारायण सुरू करण्यात आले आहे.

सुरवातीला अध्यक्षा स्वाती कुळकर्णी, सविता नाईक, माधुरीताई फडके, मंजुषा राव ह्यांच्या हस्ते श्री समर्थ रामदास स्वामी व श्री गजानन महाराज ह्यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली. सविता नाईक ह्यांचा सत्कार अध्यक्षा स्वाती कुळकर्णी ह्यांच्या हस्ते करण्यात आला. सविता नाईक ह्यांनी दासबोधावर आपले विचार मांडले व दासबोधविषयी माहिती सांगितली.

माधुरी फडके,अंजली धवसे, संजीवनी नांदेडकर, शुभदा राव, कमल बोरोले, वनिता पाटील, वत्सला चौधरी, मंगला अमृतकर, रेखा वाणी, शारदा चौधरी, शोभा पाटील, दासबोध पारायण करीत आहेत.

ह्यावेळी सुनीता सातपुते, अश्विनी जोशी, सिंधुमती वरणगावकर, आसावरी जोशी, लता झंवर, सरस्वती पाटील उपस्थित होत्या. माधुरी फडके, स्वाती कुळकर्णी, मंजुषा राव ह्यांचा सत्कार अनुक्रमे रेखा वाणी, कमल बोरोले व वनिता पाटील ह्यांच्या हस्ते करण्यात आला. माधुरी फडके ह्यांच्या हस्ते सरस्वती पाटील ह्यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी श्री नवसाच्या गणपती मंदिर, संचालक मंडळाच्या सहकार्य मिळाले. पारायण सांगता दासनवमी ला होणार आहे.

 

Exit mobile version