Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिलासादायक : पेट्रोल, डिझेल झाले स्वस्त

petrol and voting

 

मुंबई प्रतिनिधी । रविवारपासून इंधन दरात घसरण सुरु असल्यामुळे खनिज तेलाचा किंमती कमी झाली आहेत. त्यामुळे देशभरातील पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोल-डिझेल दरात कपात करत पेट्रोल १५ पैसे आणि डिझेल १४ पैशांनी स्वस्त झाले. यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

चालू आठवड्यात पेट्रोल प्रति लीटर ३५ पैसे आणि डिझेल १९ पैशांनी स्वस्त झाले आहे. जागतिक बाजारात खनिज तेल प्रति बॅरल ६४ डॉलरच्या दरम्यान आहे. मुंबईत पेट्रोल प्रति लीटर ८१ रुपये १४ पैसे आहे तर डिझेलचा दर प्रति लिटर ७२.२७ रुपये आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलसाठी ग्राहकांना ७५ रुपये ५५ पैसे मोजावे लागत असून डिझेल ६८ रुपये ९२ पैसे आहे. बंगळूरमध्ये पेट्रोलचा दर ७८ रुपये ८ पैसे असून डिझेल ७१.२ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल ७८.४९ रुपये आणि डिझेल ७२.८३ रुपये आहे.

Exit mobile version