Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही रूग्ण आढळला नाही; १४ रूग्ण झाले बरे !

जळगाव,लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात एकही कोरोना बाधित रूग्ण आढळून आला नाही. तर दिवसभरात १४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसध्दिीपत्रकान्वये कळविले आहे.

जळगाव जिल्ह्यात आज एकही बाधित रूग्ण आढळून आलेला नाही. तर आज दिवसभरात १४ कोरोना बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ५१ हजार ५०५ कोरोना रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४८ हजार ८४६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर आजपर्यंत २ हजार ५९१ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ६८ कोरोना बाधित रूग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसध्दिीपत्रकान्वये कळविले आहे.

Exit mobile version