Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिलासादायक : रावेर ग्रामीणमधील ४० टक्के घटली रुग्ण संख्या !

रावेर प्रतिनिधी । गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी तालुक्यातील हॉटस्पॉट गावाला वेळोवेळी दिलेल्या भेटी व कुशल रणनीतीमुळे रावेर ग्रामीण भागात सतत सुरु ठेवलेल्या अँटीजन टेस्ट कॅम्पमुळे ब्रेक दि चैनला कमालीचा ब्रेक लागला असून ४० टक्के रुग्ण घटले आहे. अशी दिलासादायक माहिती पंचायत समिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

सद्या ग्रामीण भागात ६५० कोरोना पेशंट एक्टिव आहे.आज सुध्दा सौ कोतवाल यांनी कोरोना संदर्भात महत्वाची बैठक घेऊन कोरोनाला अंतिम ब्रेक लावण्यासाठी कंबर कसली आहे.कोरोना संदर्भात रावेर तालुक्यातील सर्व ग्राम सेवकांची गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी आज ऑनलाईन व्हिडीओ काँम्फरन्सद्वारे   बैठक घेतली ब्रेक दि चैन संदर्भात सर्वांनी गांभिर्याने लक्ष घालूण कोरोना आटोक्यात आणण्याच्या सूचना ग्राम सेवकांना देण्यात आल्या यावेळी बैठकीला सभापती कविता कोळीचा देखिल सहभाग होता. यावेळी तालुक्यात ब्रेक दी चैन तोडण्यासाठी गावस्तरावर समितीने गावात गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.विना मास फिरणा-यांवर कारवाई करावी.गावात कोरोना स्टेट कँम्प लावुन सर्वांची तपासणी करण्याच्या सूचना गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी दिल्या ग्राम सेवकांना दिल्या आहे.

Exit mobile version