Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चिदंबरम यांना दिलासा; सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर

chidambaram

 

नवी दिल्ली प्रतिनिधी । आयएनएक्स मीडिया मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तिहार तुरूंगात असलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून आज दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना काही अटींवर जामीन मंजूर केला.

चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणात सुप्रीम कोर्टानं आज दोन लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि कोर्टाच्या परवानगीशिवाय देश सोडून न जाण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला. जामीन देताना सुप्रीम कोर्टानं त्यांना अन्य अटीही घातल्या आहेत. चिदंबरम यांनी पुराव्यांशी छेडछाड आणि साक्षीदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये, या प्रकरणात माध्यमांना मुलाखती देऊ नयेत, तसंच कोणतंही वक्तव्य करू नये, सुप्रीम कोर्टाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाता येणार नाही , चौकशीला संपूर्ण सहकार्य करावा आदी अटींवर सुप्रीम कोर्टानं त्यांना जामीन दिला आहे. तब्बल १०६ दिवसांनंतर चिदंबरम हे तिहार तुरुंगातून बाहेर येणार आहेत.

Exit mobile version